राजगुरुनगर येथे शिवसुंदर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर येथे डॉक्टर नितीन सुपेकर (चांभारे) पाटील व डॉ. गायत्री सुपेकर (चांभारे) पाटील यांनी सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी सर्व सोयींनी युक्त उभारलेल्या शिवसुंदर हॉस्पिटल व प्रसुतीगृहाचे उद्घाटन खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील व तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील महंत बालयोगी गणेशनाथजी महाराज यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार महेश दादा लांडगे, महंत बालयोगी गणेशनाथजी महाराज, वेदमूर्ती मधु अण्णा गवांदे, शरद बुट्टे पा., शिवकाली खेंगले इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.
शेतकरी कुटूंबातील डॉ. नितीन सुपेकर यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतीतून महनत करून आपले शिक्षण पुर्ण केले आहे. त्यांनी तालुकाभरात चाकण, राजगुरूनगर आणि पाइट अशा ठिकाणी गोरगरीबांसाठी दवाखाने काढले आहेत. त्यामुळे सुपेकर परिवाराचा नावलौकिक वाढला असल्याचे गौरव उद्गार खेड तालुक्याचे आमदार दिलीप माहिते यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर नितीनआप्पा काळजे, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका लताताई गोपाळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्या वंदना सातपुते, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या मंगल चांभारे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी उपसभापती सुगंधाताई शिंदे, ऑटोमॅक इंडिया कंपनीचे कार्यकारी संचालक रवींद्र रणसिंग, तीर्थक्षेत्र भीमाशंकरचे वेदमूर्ती मधुअण्णा गवांदे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शांताराम चव्हाण, रमेश राळे, लक्ष्मण टोपे, दशरथ गाडे पाटील, जयसिंग भोगाडे, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पा., पुणे जिल्हा अध्यक्ष साहेबराव राळे, अर्जुन टोपे, बाळासाहेब सांडभोर राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, विजयाताई शिंदे, अरुण थिगळे, आव्हाळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आव्हाळे, हवेली तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक उल्हासराव काटे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष नामदेव कलवडे, जाणीव जागृती मंचाचे अध्यक्ष विठ्ठलराव भोर, गुरुकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक प्रकाश पाचारणे, अध्यक्ष रोहिदास होले, उद्योजक आनंद डोळस, सुजाता पचपिंड, दिलीपराव गायकवाड, डॉक्टर अमोल बेनके, डॉ. विशाल खराबी, दिलीप बांबळे, प्रदीप शेवाळे, सुभाष खडके, विलास काजळे, संतोष बोरकर, राजश्री देशमुख ढवळे, संतराम गारगोटे, गिरीश टोपे, सारिका राजकर, उद्योजक शांताराम गोपाळे, उद्योजक दत्ता होले, अमूल डेअरी चांडोलीचे व्यवस्थापक विलास चव्हाण, सुपेचे सरपंच प्रकाश मोहन, उपसरपंच नकुशा घुले इत्यादी उपस्थित होते.
सर्वांचे स्वागत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव सतीश सुपेकर (चांभारे) पा. यांनी केले. प्रास्ताविक पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक अरुण चांभारे व सूत्रसंचालन निवेदक कैलास मुसळे यांनी केले तर आभार डॉक्टर नितीन सुपेकर (चांभारे) पा. यांनी मानले.