उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुटी
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्ष १५ जून पासून तर विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होतील. तथापि सध्या असलेली उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुटी देण्यात येत आहे.
सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळच्या अथवा संध्याकाळच्या सत्रात घ्यावेत. तथापि यासाठी नववी अथवा दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावण्यात येऊ नये. इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाचा बोजा न देता सुटीचा आनंद उपभोगू द्यावा, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा विषयाची सक्ती यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.