‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि.२५ जानेवारी, बुधवार दि. २६ जानेवारी व गुरूवार दि.२७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
सध्या राज्य शासनाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम, विश्वकोश निर्मितीची प्रक्रिया, आतापर्यंत प्रकाशित झालेले खंड, लहान मुलांसाठीचा विश्वकोश, विश्वकोश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मंडळामार्फत केले जात असलेले प्रयत्न आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ.राजा दीक्षित यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.