देहू नगरपंचायत निवडणुकीत चार प्रभागांमध्ये 12 उमेदवार रिंगणात
सहा उमेदवारांनी घेतली माघार
देहूगाव : देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या अनुषंगाने सुरू असलेल्या निवडणुकीतील उर्वरित चार प्रभागांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सोमवारी (दि. 10) अंतिम दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत होती. सहा अपक्ष इच्छुक उमेदवारांनी माघार घेतल्याने तीन अपक्ष उमेदवारांसह 12 जण निवडणूक रिंगणात आहेत.
देहू नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उर्वरित चार प्रभागासाठी एकूण 24 जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. छाननीमध्ये 4 जणांचे अर्ज अवैध ठरल्याने निवडणूक रिंगणामध्ये 18 उमेदवारांचा एकूण 20 नामनिर्देशन पत्र वैध झाले होते. सोमवारी अंतिम दिनी अनुक्रमे प्रभाग क्रमांक 11 – 1, 12 – 2, 14 – 1, तर 15 मधून – 2 असे सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4, भाजपाचे 4, शिवसेनेचे 1, तर अपक्ष 3 उमेदवार निवडणूक रिगणात आहेत.
प्रभाग क्र. / निवडणुकीतील उमेदवाराचे नावे
प्रभाग : 11
परदेशी पौर्णिमा विशाल
अनिता सुनील मोरे
प्रभाग : 12
मोरे सपना जयेश
मोरे सिंधुताई अशोक
मोरे रेश्मा मयूर
प्रभाग : 14
काळोखे प्रवीण रामदास
जंबूकर संजय लक्ष्मण
हगवणे सुनील मधुकर
काळोखे आनंदा सोपान
चव्हाण निता जिददल
प्रभाग : 15
टिळेकर अदित्य चिंतामण
टिळेकर प्रफुल्ल मच्छिन्द्रनाथ
प्रभाग निहाय माघार घेतलेले उमेदवार
प्रभाग क्र. 11
मोरे हेमा लक्ष्मण
प्रभाग क्र. 12
मणेर शबाना गुलाब
मुसूडगे राणी विजय
प्रभाग क्र. 14
हगवणे स्वप्नील सुदाम
प्रभाग क्र. 15
टिळेकर ईश्वर अंकुश
बोडके किरण महादू