नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला तांत्रिक अडचणींमूळे ब्रेक
बोर्डाचा निर्णय न झाल्यामूळे धोरण अधांतरी
पुणे । सह्याद्री लाइव्ह । राज्यात २०२३ च्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण स्विकारण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. पण या धोरणाची वास्तविक अंमलबजावणी अनेक तांत्रिक अडचणींमूळे अधांतरी असल्याचे दिसत आहे.
राज्यात चालु शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक घोरण सुरू करण्यात येणार असल्याची घोषण शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली होती. परंतू अद्याप या धोरणासाठी आराखडा तयार नसल्यामूळे धोरणाच्या अंमलबजावणीला ब्रेक लागला आहे.
जुनी १०+२ ही पद्धत बंद करून नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे ५+३+३+४ अशी नवी शैक्षणिक व्यवस्था या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार होती. परंतू या व्यवस्थेला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
नव्या पद्धतीनुसार दहावीला बोर्ड नसल्यास अकरावीला बोर्ड असणार का, याबाबतचा ठाम निर्णय अद्याप झालेला नसल्यामूळे नवे शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येत आहेत.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES