द एलाईट स्कूलमध्ये इको फ्रेंडली गणपती बाप्पाचे विसर्जन
by
sahyadrilive
September 7, 2022 1:43 PM
खेड । सह्याद्री लाइव्ह । द इलाईट स्कूल अँड जुनियर कॉलेज या शाळेमध्ये यावर्षी गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात झाले, शाळेमध्ये पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सजावटी साठी नैसर्गिक साधनांचा वापर करून तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक ओरिगामीच्या साहाय्याने पर्यावरण व वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला होता.
सजावटीचे काम शाळेतील शिक्षिका भाग्यश्री कोळेकर, अश्विनी कोळेकर, अनिता मकासरे, मनीषा साळवी, आशा जोनह, स्नेहल शिवेकर, सीमा कोळेकर, यांनी केले, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा डांगले, उपमुख्याधापिका आशा जोनहा, व्यवस्थापिका पल्लवी जयसिंग दरेकर यांनी विशेष सहाय्य केले.