मी आई शिवरामाची (कविता)
by
sahyadrilive
March 24, 2022 4:13 PM
मी आई शिवरामाची
हसत हसत फासावरती मुखी शोभे त्या घोषणा
दगडांनाही घाम फुटावा नाही केली दया याचना
मनात नव्हते भय किंचित पेटविली क्रांतीची मशाल
वंदे मातरम मुखीम्हणता भलेही येवो मरण खुशाल
तुझी प्रेरणा नवतरूणांना पेटतील लाखोच्या ज्वाला
व्यर्थ ना जाई हे बलिदान माझ्या शिवरामा रे बाळा
तुझ्या मृत्यूचा सोहळा झाला जन्मादिनापरी लई हा भारी
तुझ्या स्वागता आज उभी ही गर्दी स्वर्गातली समदीबघ सारी
धन्य झाली कूस माझी माझ्या पोटी पुन्हा यावा
मातृभूमीच्या सेवेसाठी ऐसा पुत्र मज लाभावा
मी आई त्या शिवरामाची मज वाटे सार्थ अभिमान
तुझ्या मुळे आज मिळाला क्रांतीवीरा आईचा सन्मान
कवी अशोक सोपान सांडभोर
महात्मा गांधी विद्यालय, रा. नगर, ता. खेड, जि. पुणे