हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्रा. दिलीप मुळूक यांना पीएच. डी.
खेड : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा. दिलीप मुळूक यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे.
प्रा. दिलीप मुळूक यांच्या यशाबद्दल खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक शांताराम घुमटकर, डॉ. रोहिणी राक्षे, हिरामण सातकर, प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते.
प्रा. दिलीप मुळक यांनी ॲन असेसमेंट ऑफ डेमोग्राफिक कॅरेक्टरीस्टीक ॲन्ड इम्पॅक्ट ऑफ पॉप्युलेशन प्रेशर ऑन लॅन्ड रिसोर्सेस इन पुणे डिस्ट्रिक्ट (महाराष्ट्र) या विषयावर पीएच. डी. पदवीसाठी संशोधन केले. पुण्यातील टी. जे. महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. दिलीप मुळूक यांनी पुणे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास आणि लोकसंख्येचा भूमी संसाधनांवरील दबावाचे मूल्यांकन या विषयावर सविस्तर संशोधन केल्याबद्दल संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.
या वेळी देवेंद्र बुट्टे पाटील म्हणाले की, या संशोधनाचा उपयोग पर्यायी नागरी वसाहती उभारण्यासाठी होईल. या वसाहतींची निर्मिती होत असताना नैसर्गिक साधन संपत्तीला हानी न पोहचवता शहरालगतच्या तालुक्यांमध्ये पडिक जमिनींचा वापर करून मानवी साधनसंपत्तीचा विकास होण्यास मदत होणार आहे.
प्रा. दिलीप मुळूक यांच्या यशाबद्दल त्यांचे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय शिंदे यांनी केले.