मनी लाँडरिंग प्रकरणात ऋषिकेश देशमुख यांचा जामीन अर्ज मागे
by
sahyadrilive
November 22, 2022 3:28 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मनी लाँडरिंग प्रकरणात जवळपास दीडवर्षापासून कारागृहात आहेत. ईडी, सीबीआयच्या कारवाईनंतर त्यांना अटक झाली होती. अनेकदा त्यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आलेला आहे.
या प्रकरणात अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख सुद्धा आरोपी आहेत. ऋषिकेश देशमुख यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना ईडीने यापूर्वी समन्सही बजावल्यानंतरही ते कधीही ईडीसमोर हजर झाले नव्हते.