सर्वोत्कृष्ट योगविद्यार्थी चिराग राठोड व हेमा देवकर यांचा गौरव
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । बदललेल्या जीवनशैलीमुळे शारीरिक तंदुरूस्ती जोपासण्याची गरज सर्वच वयोगटांमध्ये निर्माण झाली असून त्यासाठी समाजात योगविषयक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. नागरिकांनी जाणीवपूर्वक योग-क्रीडा संस्कृती जोपासून समाजाचे प्रबोधन करण्याचे आवाहन सचिन योग संस्थेचे संस्थापक सचिन बेंडुरे यांनी केले. ते राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते.
यावेळी सर्वोत्कृष्ट योगविद्यार्थी म्हणून चिराग राठोड व हेमा देवकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले. मिलिंद डोळस व संतोषी जैद यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आयुष बच्चे, प्रविण घुमटकर, अमित टाकळकर, सचिन साबळे, वैभव करमारे, देवदास जाधव, संतोष सांडभोर, अपूर्वा भालेराव, अशोक राजापुरे आदींनी यशस्वी नियोजन केले. राकेश सांडभोर यांनी आभार मानले.