घरगुती उपाय : चमकणा-या काळेभोर, लांबसडक केसांसाठी हे उपाय नक्की करा…
केस, सुंदर दिसण्याचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. अनेक तेल, शॅम्पू, केमिकल्स, जेल, रंग मोठया प्रमाणावर मार्केटमध्ये दिसतात व खरेदी केल्या जातात. बरं केमिकल्सयुक्त उत्पादने हानीकरक होऊ शकतात हे त्यावर लिहिलेले असूनही सर्रास वापरले जातात. पण याऐवजी काही घरगुती उपाय केसांच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात…
निरोगी केसांसाठी हे उपाय करा
लोह – लोहयुक्त आहार घेऊन किंवा लोखंडाची कढई, तवा, चमचे यांचा वापर रोजचे जेवण बनवतांना करा. लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होऊ शकते. तसेच आहारात बीट, शेंगदाणे, गूळ यांचा वापर वाढवून आपण रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवू शकतो. शरीरात योग्य प्रमाणात लोह असेल तर केसांचे आरोग्य चांगले राहते. केसांची गळती कमी होते.
व्हिटामिन ‘A’
आपल्या सर्वांनाच माहीत आहे गाजर, पपई यासारखी नारंगी व पिवळ्या रंगाची फळे व भाज्या व्हिटामिन A चा मुख्य स्रोत आहे. व्हिटामिन A च्या कमतरतेमुळे केसांमध्ये खाज उत्पन्न होते, केसांची मुळे कुमकुवत होतात, तसेच स्काल्प वर जखमा होतात, अशावेळी व्हिटामिन A खूप उपयोगी असते.
व्हिटामिन ‘B’
व्हिटामिन B चे अनेक प्रकार आहेत. B7 केसांसाठी उपयुक्त असून याच्या कमतरतेमुळे केस गळतात, लहान मुलांची वाढ खुंटते. तसेच विटामिन बी कमतरतेमुळे अनेमिया, तोंड येणे, मुंग्या येणे, झोप न लागणे अशी अनेक लक्षणे आपल्याला दिसतात. मुख्य स्रोत म्हणजे दूध, पनीर, मांस, मासे हे होय. हिरव्या पालेभाज्या मध्ये बी जीवनसत्व नसते.
व्हिटामिन ‘D’
यामुळे केस गळतात हाडे कमजोर होतात. हाडे कमजोर झाली की केस गळतात. व्हिटामिन D मुख्य स्रोत सूर्यप्रकाश, सकाळचे कोवळे ऊन आहे.