उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
by
sahyadrilive
January 8, 2022 3:31 PM
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, “मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात दि. 6 जानेवारी 1832 रोजी करुन मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला वंदन. मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.”