येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी
नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शहरात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. येवल्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पापैकी एक असलेल्या या शिवसृष्टी प्रकल्पाच्या जागेची पाहणी आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, दीपक लोणारी,तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी,आर्किटेक्ट सारंग पाटील,हितेश मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
येवला विंचूर चौफुली जवळील शहरातील पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या जागेत भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या जागेवर असलेल्या जुन्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून जागेचे सपाटीकरण व स्वच्छता करण्याचे काम करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाले असून या कामाची आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.