राज्यपाल कोश्यारींचे वक्तव्य वादग्रस्त
मुंबई | सह्याद्री लाइव्ह। मागील आठवड्यात राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नविन वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्यातून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. शिंदे गटानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
या राज्यापालांना कुठेही न्या. पण हे राज्यापाल महाराष्ट्रात नको अशी मागणी शिंदे गटातील आमदारांनी केली, महाराष्ट्राला समजून घेणारेच आम्हाला राज्यपाल हवेत असेही म्हणाले.
काय म्हणाले शिंदे गटाचे आमदार?
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ही मागणी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला विनंती केली. ज्या राज्यपालांना आपला इतिहास माहिती नाही. ज्याला राज्याचे राज्य काय आहे हे कळत नाही. अशा माणसाला आपल्या दिलदार मनाच्या राज्याच्या पदावर ठेवू नये. यासाठी महाराष्ट्राच्या मातीतीलच मराठी माणूस राज्यपदावर बसवा. ह्या राज्यपालांना कुठे पाठवायचं आहे. तिथ पाठवा असे गायकवाड यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी ?
कोणाला सुभाष चंद्र, कोणाला नेहरु, कोणाला गांधीजी चांगले वाटत असत. ज्याला जी व्यक्ती चांगली वाटत असेल तो त्या व्यक्तीचे नाव घेत असत. आज तुम्हाला आदर्श शोधायचे असतील तर कोठे बाहेर जाण्याची मुळीच गरज नाही.
तुम्ही महाराष्ट्रातच आपले आदर्श शोधू शकतात. जर तुम्हाल कोणी विचारले तुमचे हिरो कोण आहेत तर मला वाटते तुम्हाला ते इथेच मिळती. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.