राज्यपालांनी केले विजय दर्डा यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
by
sahyadrilive
September 1, 2022 1:45 PM
मुंबई । सह्याद्री लाईव्ह। लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांसह तीन कलाकारांच्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जहांगीर कलादालन मुंबई येथे झाले.
‘फोर स्टोरीज’ या कला प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार प्रफुल्ल पटेल, स्वामी नित्यानंद, अभिनेते जॅकी श्रॉफ, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, तसेच प्रदर्शनातील सहभागी कलाकार रचना दर्डा, जयश्री भल्ला व बीना उपस्थित होते.
या प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराची एक कलाकृती आपण राजभवनासाठी खरेदी करीत असल्याचे राज्यपालांनी यावेळी जाहीर केले.