शेअर बाजारात संयमाने आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास चांगले लाभ – अरविंद शिंदे
खेड : शेअर बाजारात संयमाने व अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर चांगल्या प्रकारे लाभ मिळतो, असे गुंतवणूक सल्लागार (समभाग बाजार) अरविंद शिंदे यांनी राजगुरुनगर येथे सांगितले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हॉलमध्ये राष्ट्रवादी लीगल सेलच्या वतीने ‘शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अरविंद शिंदे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास पुणे जिल्हा राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष ॲड. दिलीप करंडे, लीगल सेलचे खेड तालुका अध्यक्ष ॲड. अरुण मुळूक, आखरवाडीच्या सरपंच मोनिका मुळूक, ज्येष्ठ विधिज्ञ संभाजी मिंडे, शंकर कोबल, संजय गोपाळे, राजेंद्र कुलकर्णी, संदीप घुले, मिलिंद रोडे, प्रशांत राक्षे, शरद नवले, रोहिदास (महाराज) मांजरे, विकास टाकळकर, दिगंबर मुळूक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अतुल उर्फ प्रदीप गोरडे यांनी केले. ॲड. दीपक चौधरी यांनी आभार मानले.