साताऱ्याच्या सुदेशनाला सुवर्णपदक
by
sahyadrilive
November 16, 2022 12:35 PM
गुवाहाटी। सह्याद्री लाइव्ह । गुवाहाटी येथे ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा संपन्न झाली. शेवटच्या दिवशी साताऱ्याच्या आंतरराष्ट्रीय धावपटू सुदेशना शिवणकरने २० वर्षांखालील मुलींच्या दोनशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. विश्व ज्युनिअर स्पर्धेत भाग घेतलेल्या सुदेशनाने २४.३४ सेकंदात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक आपल्या नावे केले.
१०० मीटर शर्यतीत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी स्पर्धेतील हे तिचे दुसरे पदक आहे. शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल १५ पदके जिंकली. त्यात एक सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा ब्राँझपदकाचा समावेश आहे. स्पर्धेत महाराष्ट्राने आठ सुवर्ण, पंधरा रौप्य आणि पंधरा ब्राँझपदके जिंकली.