बेकायदा पिस्तुल बाळगणारा गजाआड
by
sahyadrilive
October 6, 2022 6:56 PM
चाकण । सह्याद्री लाइव्ह। कडाचीवाडी येथील बापदेव वस्ती परिसरात बेकायदा पिस्तुल बाळगणा-यास चाकण पोलिसांनी अटक केली. आदिनाथ भाऊसाहेब झिंजुरके (वय २१, रा. कडाचीवाडी, ग्रामपंचायतीजवळ, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखा युनीट तीनचे पोलीस शिपाई योगेश्वर औदुंबर कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे. कडाचीवाडी परिसरात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आदिनाथ झिंजुरके हा देशी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.