विभागीय क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधेसाठी निधी उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री संदिपान भुमरे
औरंगाबाद । सह्याद्री लाइव्ह । खेळाडूंना त्यांच्या मागणीनुसार विभागीय क्रीडा संकुलात सिथेंटीक ट्रॅक, फुटबॉलचे ग्राऊंड, टेबल टेनिसची सुविधा तसेच प्रशिक्षित कोच उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश पालकमंत्री तथा रोहीयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज र्स्माट सिटी कार्यालयात आयोजित क्रीडा विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पलिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी, विभागीय क्रिडा अधिकारी घुगे यांची उपस्थिती होती.
विभागीय क्रीडा संकुलातील सर्व सुविधा अद्ययावत करुन राज्यस्तर, व राष्ट्रीय पातळीवर यशस्वी खेळाडू निर्माण करण्यासाठी विभागीय क्रीडा संकूल साह्यभूत ठरावे यासाठी विविध स्पर्धाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोच उपलब्ध करावेत . गारखेडा परिसरातील सूतगिरणी परिसरात 26 एकर जागेवर विभागीय क्रीडा संकुलातील कच्चा रस्ता, स्वच्छता, वीज पुरवठ्यासाठी सोलार यंत्रणा तसेच उर्वरित रस्ता बांधणी यासारख्या कामांना निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे भुमरे यांनी सांगितले.
विभागीय क्रीडा संकुलाबरोबर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या क्रीडागंण व संकुलातील सुविधाविषयक आढावा घेऊन खेळाडूसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधेसाठी निधीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री भुमरे यांनी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.