मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
by
sahyadrilive
November 17, 2022 11:41 AM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील स्मृतिस्थळावर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, खासदार भावना गवळी, आमदार भरत गोगावले, सदा सरवणकर, प्रताप सरनाईक, कालिदास कोळंबकर, माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते.