गाडकवाडी गावात ग्रामस्थांसाठी “मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप”
१३० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी घेतला शिबिराचा लाभ
गाडकवाडी (ता. खेड) सह्याद्री लाइव्ह । दापोडी, पुणे येथील श्रीमती सी.के गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर (NSS) गाडकवाडी गावात अयोजित करण्यात आले होते. या शिबरिामध्ये गुरुवारी (दि. १८) “मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप” करण्यात आले. या शिबिरामध्ये १३० पेक्षा अधिक गावक-यांनी सहभाग घेत आपली नेत्र तपासणी करून घेतली.
श्रीमती सी.के गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने श्री. मयूर दौंडकर युवा फाउंडेशन राजगुरुनगर यांच्या सौजन्याने गावातील लोकांसाठी या मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला गाडकवाडी ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला. गुरूवारी (दि. १८) गाडकवाडी ग्रामपंचायतच्या सभागृहात या नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय बडे, आकाश दौंडकर, स्वप्निल दौंडकर, अक्षय विधाते, हे मान्यवर उपस्थित होते. तसेच आनंदराव गाडगे, काळूराम राक्षे, संभाजी गावडे, विठ्ठल गावडे, फुलचंद सरडे आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.
मोफत नेत्रपासणी व चष्मे वाटप शिबिरासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. गावामध्ये वयोवृद्ध लोकांची संख्या मोठी असून त्यांना या शिबिराचा मोठा फायदा झाला. या शिबिरामध्ये १३० पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला.
खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाडकवाडी या ठिकाणी दापोडी पुणे, येथील जनता शिक्षण संस्थेचे श्रीमती. सी.के गोयल कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे “विशेष श्रम संस्कार शिबिर” सोमवार १४ जानेवारी ते शनिवार 20 जानेवारी कालावधीत संपन्न झाले. या शिबिरामध्ये सामाजिक जाणिवेच्या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये गावक-यांसाठी “महिला उद्योजकता विकास शिबिर”, “मोफत पशु चिकित्सा शिबिर”, ” मोफत डोळे तपासणी व चष्मेवाटप शिबिर” असे उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
सकाळी श्रमदान, दुपारी व्याख्यान मला, संध्याकाळचे सांस्कृतिक कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहाने सात दिवस या शिबिरात पार पडले. या कार्यक्रमांना गावातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय बडे म्हणाले, “मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून गाडकवाडी सारख्या दुर्गम भागात वयोवृद्ध माणसांचे प्रमाण जास्त असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर गरजेचे होते. त्या दृष्टीने सदर शिबिर राबविण्यात आले आहे”.
“गाडकवाडी सारख्या गावामध्ये २१व्या शतकात असताना सुद्धा मोबाईल अभावी संपर्कासाठी लोकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत व संबंधित विभागाशी पाठपुरावा करून ग्रामस्थांसाठी मोबाईल टॉवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येऊन प्रदीर्घ प्रलंबित समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासनही यावेळी त्यांनी गावक-यांना दिले.
शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा. उत्तम गोरड, प्रा. अक्षदा पानसरे, लक्ष्मण कोहीणकर यांनी केले. संयोजनासाठी रत्नप्रभा मोरे, काजल काटे,, कपिल कांबळे, धीरज ससाणे व इतर विद्यार्थ्यांचे सहकार्य त्यांना लाभले.
शिबिराचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बाळासाहेब यांनी केले. प्रास्ताविक विजय बडे यांनी केले. तर स्वप्निल दौंडकर यांनी आभार मानले.