राज्यभरात हिवतापाचे साडेचार हजार रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती
गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीनुसार रुग्णसंख्येत यावर्षी मोठी घट
पुणे । सह्याद्री लाइव्ह । राज्यात हिवतापाचे चार हजार ५४६ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली असून मागील चार वर्षांच्या आकडेवारीनुसार रुग्णसंख्येत यावर्षी मोठी घट झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आरोग्य विभागाकडून हिवताप निर्मूलनासाठी विशेष योजना राबवल्या जात असतात. यावर्षी हिवतापावर ब-याच अंशी मात केल्याचे चित्र दिसते आहे.
रुग्णसंख्येची आकडेवारी
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरात २०२० मध्ये १२,९०९ हिवतापाचे रुग्ण सापडले होते. त्यानंतर २०२१ मध्ये मागच्या चार वर्षांमध्ये सर्वाधिक १९,३०३ रुग्ण राज्यभरात आढळले होते. २०२२ ही संख्या १५,४५१ इतकी होती. यावर्षी रुग्णसंख्येत कमालीची घट झालेली दिसत आहे. २०२७ पर्यंत हिवताप आजाराचे निर्मुलन करण्याचे आरोग्य विभागाचे उदिष्ट आहे.
काय आहे हा हिवताप?
भारतामध्ये प्रामुख्याने ‘प्लाझमोडिअम फॅलसिपॅरम’ आणि ‘मलेरिया’ या परजीवींमुळे हिवताप होतो. माणसाच्या शरीरात हे परजीवी विषाणू यकृत पेशींमध्ये व रक्ताच्या पेशींमध्ये येतात. या आजाराचे ८० टक्के रूग्ण हे डोंगराळ व दुर्गम भागामध्ये आढळून येतात. राज्यात गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, रायगड, गोंदिया, पालघर, पुणे, अमरावती, नागपूर आणि कोल्हापूर या दहा जिल्ह्यांमध्ये हिवतापाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES