घड्याळाला पाच तर कपबशीला सहा जागा
तिन्हेवाडी सोसायटीची अटीतटीची दुरंगी लढत
राजगुरूनगर : तिन्हेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 11 जागांसाठी अटीतटीच्या दुरंगी लढत झाली. त्यात घड्याळाला पाच, तर कपबशीने सहा असे अटीतटीची संचालक निवडून आले आहेत.
तिन्हेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत दोन मतदान केंद्रावर रविवारी शांततेत मतदान झाले होते. 466 पैकी 408 मतदान झाले होते. सहकार निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी हर्षद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मतमोजणी करून निवडणूक निकाल जाहीर केला. निवडणुकीचे कामकाज संतोष लादे आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडले.
गटनिहाय विजयी उमेदवार (मिळालेली मते) :
खुला गट (आठ) : भास्कर मारुती जगदाळे (205), अशोक गोंविद आरुडे (198), शिवाजी महादेव आरुडे (186), राजेंद्र शांताराम पाचारणे (184), विजय शंकर सांडभोर (184), मधुकर आनंदराव सांडभोर (171), तात्याबा सीताराम आरुडे (169), बाळासाहेब तुकाराम आरुडे (168). या गटात 21 मते बाद ठरली. महिला गट (दोन जागा) : प्रतीक्षा संतोष पाचारणे (243), कमलाबाई रामदास पाचारणे (204). या गटात 12 मते अवैध ठरली. इतर मागास प्रवर्ग : अरुण राघु थिगळे (213). या गटात 16 मते बाद.
लक्ष्मी दर्शनाची चर्चा
सोसायटीच्या या निवडणुकीत दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले होते. मतदारांच्या मतासाठी मोठी रस्सीखेच झाली. त्रिलोकेश्वर ग्रामविकास सहकार पॅनलने घड्याळ चिन्हावर 11 तर श्री बापदेव जानुबाई वाघोबा शेतकरी सहकार पॅनलेने कपबशी चिन्हावर 11 तगडे उमेदवार देऊन कडवे आव्हान दिले होते. गावपातळीवरील झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांना अवकाळी पावसाच्या तडाख्यात ऐन थंडीच्या मोसमात ऊबदार लक्ष्मीदर्शन झाल्याची चर्चा चांगलीच रंगली.