भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी माजी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर
by
sahyadrilive
November 18, 2022 4:20 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । आय. आय.टी. चे माजी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी एप्रिल 2020 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. ते २०२० पासून तळोजा तुरुंगात होते.
मुंबई उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर तेलतुंबडे यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात ते उपस्थित नव्हते आणि त्यांनी कोणतेही भडकाऊ भाषणही केली नाहीत, असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.