sahyadrilive
administrator
गुळाणी । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यातील गुळाणी गावच्या हद्दीतील पारगाव रस्त्यावरील अतिक्रमणाचा वाद उफाळून आला आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचा आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. सात महिने उलटूनही रस्ता अजून कागदावरच राहिलेला आहे. अधिका-यांच्या चालढकलपणामुळे स्थानिक ग्रामस्थ, नागरिक आक्रमक झाले असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गुळाणी गावच्या ग्रामस्थांनी हरिप्रसाद खळदकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार, प्रांत कार्यालय आणि खेड पोलीस ठाण्यात रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत निवेदन दिले आहे. पुढील सात दिवसांमध्ये रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी जोर धरीत आहे. पुढील सात दिवसांत अतिक्रमण हटवले नाही तर ग्रामस्थांसोबत तहसीलदार कार्यालयापुढे बेमुदत उपोषणाचा इशारा खळदकर यांनी दिला आहे.
खेड तालुक्याच्या गुळाणी गावातील खळदकरवस्तीला आंबेगाव तालुक्यातील पारगावशी जोडणारा रस्ता आहे. खेड आणि आंबेगाव या दोन तालुक्यांना जोडणारा गुळाणी ग्रामीण मार्ग (क्रमांक २/३७) आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण गेल्या काही दिवसांत चर्चेचा विषय ठरली आहे. मागील काही काळात ग्रामस्थांनी अतिक्रमण करीत घरे बांधली. हे अतिक्रमण हटवण्यासाठी २०२१ साली तहसीलदारांना निवेदन दिले. प्रशासनाने ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेतली. ग्रामस्थांच्या या सुनावणीचा निकाल ऑक्टोबर २०२२ मध्ये देण्यात आला. या सुनावणीमध्ये तहसीलदार कार्यालयाने अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेश दिले.
गुळाणी ग्रामस्थांच्या तक्रारी, मागणीनुसार प्रशासनाने ही कार्यवाही केली. तहसीलदारांनी दिलेल्या या आदेशामध्ये मंडल अधिकारी आणि खेड पोलिसांच्या निरीक्षणाखाली करावी, असेही नमूद केले आहे. परंतु तहसीलदारांच्या या आदेशाला सात महिने उलटूनही अद्यापर्यंत हे अतिक्रमण हटवले गेलेले नाही.
यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. रस्त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाची आरोळी दिली असून, प्रशासनाला सात दिवसांची मुदत दिली आहे.
administrator
जगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत? सबस्क्राइब करा
आपण वृत्तपत्राची यशस्वीरित्या सदस्यता घेतली आहे
आपली विनंती पाठवण्याचा प्रयत्न करताना एक त्रुटी आली. कृपया पुन्हा प्रयत्न करा.