‘दिलखुलास’ कार्यक्रमात ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची मुलाखत
मुंबई : राज्य शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “दिलखुलास या कार्यक्रमात ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्युज ऑन एआयआर’ या ॲपवरून शनिवार दि. ५ आणि सोमवार दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्य सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याच्या ऊर्जा विभागाने गेल्या दोन वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली आहे.कृषीपंप जोडणी धोरणाची आणि अपारंपरिक ऊर्जा धोरणांची वैशिष्ट्ये, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊर्जा विभागाचे प्रयत्न, उद्योगांना दिलासा देण्यासाठी उचलली जात असलेली पाऊले,निसर्ग चक्रीवादळ तसेच तोक्ते चक्रीवादळात ऊर्जा विभागाने केलेला.
विविध आव्हानांचा मुकाबला,मुंबई महानगराचा वीजपुरवठा १२ ऑक्टोबर २०२० रोजी अचानक खंडित झाला असताना तो सुरू करण्यासाठी केलेले युद्ध पातळीवरील प्रयत्न,कोरोना काळात टाळेबंदी लागू असताना ऊर्जा विभागाचे काम,भविष्यासाठी निरंतर ऊर्जेसाठीचे नियोजन अशा सर्व निर्णयांची व विविध नाविण्यपूर्ण योजनांची माहिती, मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.