पावसाचे साचलेले पाणी कायम असल्याने पाच सोसायट्यांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणासाठी बंद
by
sahyadrilive
October 19, 2022 10:14 AM
पुणे । सह्याद्री लाइव्ह । सोमवारी रात्री ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शहरातील जलमय भागातील विस्कळीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. मात्र रास्तापेठ विभाग अंतर्गत एनआयबीएम परिसरातील पाच सोसायट्यांच्या तळमजल्यावर मीटर बॉक्स व मीटर संच असलेल्या ठिकाणी अद्यापही पाणी साचलेले आहे. त्यामुळे वीजसुरक्षेला प्राधान्य देत संभाव्य धोका टाळण्यासाठी वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
एनआयबीएम परिसरातील साईदर्शन, द लॅटीट्यूड, अर्चना कॅसल, ब्रम्हा मॅजेस्टिक व मनीष प्लाझा अशी या सोसायट्यांची नावे आहेत. या सोसायट्यांमधील साचलेले पाणी काढण्याचे काम सुरु आहे. पाण्याचा निचरा झाल्यानंतर वीजयंत्रणेची पाहणी करून रात्री उशिरा या सोसायट्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे. तोपर्यंत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.