ऐंशी वर्षीय वडिलांनी स्वत:च्या लग्नासाठी विवाह नोंदणी केली म्हणून मुलाने वडिलांचा दगडाने ठेचून केला खून
राजगुरुनगर शहरातील धक्कादायक घटना; पोलीस ठाण्यात हजर होत मुलाने दिली खुनाची कबुली
राजगुरूनगर : ८० वर्षे वय असलेल्या वडिलांनी लग्नासाठी विवाह नांवनोंदणी केल्याचा रागातून मुलाने वडिलांचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना राजगुरूनगर शहरात घडली आहे.शंकर रामभाऊ बो-हाडे ( वय ८० , रा. वैशांयपन आळी, राजगुरूनगर, ता. खेड) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. शेखर शंकर बो-हाडे (वय ४७ ) असे खून केलेल्या मुलाचे नाव आहे.
खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजगुरूनगर येथील ८0 वर्षीय शंकर बोऱ्हाडे यांनी स्व:ताच्या लग्नासाठी वधू -वर सूचक मंडळात विवाह नाव नोंदणी केली होती. त्यामुळे चिडून जाऊन मुलाकडून वयोवृद्ध वडीलांचा दगडाने ठेचून खून केला. खून केल्याची कबुली व फिर्याद स्वत: आरोपीने पोलीस ठाण्यात येऊन दिली..त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार शंकर रामभाऊ बो-हाडे यांनी परस्पर वधू-वर सूचक मंडळात पैसे भरून स्वत:च्या लग्नाची नोंदणी केली होती. याबाबत आरोपी मुलगा शेखर बो-हाडे यांच्याशी वडील शंकर बोऱ्हाडे खोटे बोलले. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने शेखर बोऱ्हाडे यांने किचन रूममधील कांदा कापण्याची सुरी घेवुन वडीलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला; परंतु सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही. घरात असलेल्या दगडी वरवंटयाने वडील शंकर बोऱ्हाडे यांच्या तोंडावर व डोक्यात जोराचे प्रहार करून खून केला. या घटनेचा पुढील खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव तपास करीत आहेत.