वांग्याची भाजी
साहित्य
पाव किलो मध्यम आकाराची वांगी, शेंगदाणे, खोबरे, लसूण, आले, कढीपत्ता, कोथांबिर, मिरची जीरे, मोहरी, हिंग, हळद, कांदा लसूण मसाला, संडे मसाला, एक कांदा
कृती
सगळ्यात आधी वांगी स्वच्छ धुन चिरून घ्यावी कढई तपावावी त्यात शेंगदाणे, खोबरे, मिरची भाजून घ्यावी त्यात आले, लसूण, कोथंबिर वाटून घ्यावी तापलेल्या कढईत दोन चमचे तेल घालून जीरे मोहरी हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन त्यात चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा नंतर त्यात तयार केलेले वाटण घालावे त्यात कांदा लसूण मसाला, संडे मसाला, हळद, धने पूड, संडे मसाला टाकून मिश्रण तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे त्यात आवश्यतेनुसार मीठ घालून गॅस बंद करावा चिरलेल्या वांग्यामध्ये ते मिश्रण टाकावे व वांगी छान परतून घ्यावी नंतर त्यात आवश्कतेनुसार पाणी टाकून वांगी मंद आंचेवर शिजून द्यावी. हि भाजी तुम्ही भात, भाकरी व चपाती सोबत खाऊ शकता.
-कोमल शिंदे