इंडोनेशियात भुकंप लहरींनी झाली जीवीतहानी
जकार्ता। सह्याद्री लाइव्ह। इंडोनेशियाची राजधानी येथे सोमवारी ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. जकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात २० जणांचा मृत्यू झाला तर ३०० जण जखमी आहेत. या भूकंपात घरांची पडझड झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये 10 किमी खोलीवर होता. मात्र, यामुळे स्तुनामी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही.
याआधी शुक्रवारी रात्री पश्चिम इंडोनेशियामध्ये जोरदार भूकंप झाला होता . या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी नोंदवली होती. त्याचा केंद्रबिंदू दक्षिण बेंगकुलूपासून 202 किमी नैऋत्येस 25 किमी खोलीवर होता. यानंतर दुसरा धक्का बसला, ज्याची तीव्रता 5.4 होती.