दृष्यम २ चा ट्रेलर रिलिज
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । ‘दृष्यम’ या २०१५ मध्ये आलेल्या थ्रीलर सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला असून १८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलरमध्ये अक्षय खन्ना पोलिसाच्या दमदार भुमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचे काही सिन सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
दृष्यम २ अजय आणि त्याच्या परिवाराची ७ वर्षांनंतरची कहानी सांगत आहे. अजय देवगण, तबु, श्रिया सरन, रजत कपुर, कमलेश सावंत या जुन्या कलाकारांसोबत बहुआयामी कलाकार अक्षय खन्नाही या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
सात वर्षांपूर्वी आलेल्या दृष्यम चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. अजय देवगणचा दमदार अभिनय आणि चित्रपटाच्या गुंतवून ठेवणा-या कहानीमुळे हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटावर आधारित अनेक जोक्स आणि मिम्स सोशल मिडीयावर अजुनही पहायला मिळतात. त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाच्या सिक्वलची आतुरता लागली आहे.