ॲड. अविनाश गानू यांच्याकडून राजगुरुनगर मधील विविध संस्थाना देणगी
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । कै. शंकरराव गानू जन्मशताब्दी समारोहानिमित्त राजगुरुनगर मधील विविध संस्थांना शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी ॲड. अविनाश गानू यांच्याकडून देणग्या देण्यात आल्या. हा देणगी प्रदान सोहळा सोमवारी (दि.२४) महात्मा गांधी विद्यालयातील बाफना रंगमंदिरावरील सभागृहात संपन्न झाला.
ॲड. अविनाश गानू व त्यांच्या परिवाराकडून खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या ग्रंथालयास एक लाख रुपये, सार्वजनिक वाचनालयास एक लाख रुपये तसेच राजगुरुनगर नगर परिषदेस ‘बालोद्यान’ सुरु करण्यासाठी १२ गुंठे भूखंड अशा देणग्या देण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमामध्ये ॲड. अविनाश गानू, गणेश जोशी, सुभाष दांडेकर, प्रमोद गानू, रेखाताई क्षोत्रीय, काळूराम सांडभोर यांनी मनोगते व्यक्त केली. खेड तालुका एज्युकेशन सोसायटी, राजगुरुनगर नगर परिषद, ब्राह्मण सभा यांच्या वतीने ॲड. अविनाश गानू व माधुरी गानू, यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी ॲड. अविनाश गानू, माधुरी गानू, गानू परिवार, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव गणेश जोशी, संचालक कैलास सांडभोर, विनायक दीक्षित, डॉ. प्रदिप शेवाळे, ॲड. संदिप भोसले, प्रदिप कासवा, गणेश घुमटकर, बबनराव थोरात, डॉ. माणिक बिचकर, सुरेखा क्षोत्रीय, ज्ञानेश्वर करंडे, राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद गानू, नगर परिषदेचे आस्थापना प्रमुख अविनाश काळाने, स्थापत्य अभियंता सुर्यकांत गवळी, माजी नगरसेवक मनोहर सांडभोर, राहुल आढारी, मंगेश गुंडाळ आणि तीनही विद्यालयांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना गोडसे यांनी केले तर विलास खेडकर यांनी आभार प्रदर्शन केले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES