‘तुळशी’माळ घालण्याचे ‘हे’ फायदे ठाऊक आहेत? जाणून घ्या ‘धार्मिक’ आणि ‘आरोग्यविषयक’ फायदे
पुणे : आपल्या धार्मिक विधींमध्ये तुळशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णूंच्या नैवेद्यात आवर्जून तुळस वापरतात. तुळशीचे धार्मिक महत्त्व असण्याव्यतिरिक्त आयुर्वेदिक महत्त्व देखील आहे.
बरीच औषधे बनविण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो. सर्दी पडसं आणि हंगामी फ्लू मध्ये देखील तुळशीच्या पानांचा काढा बनवून वापर केला जातो. हिंदू धर्मात तुळशीची माळ घालण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. या माळेचे धार्मिक महत्त्व असण्यासह वैज्ञानिक महत्त्व देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे फायदे.
तुळशीची माळ घालण्याचे धार्मिक महत्त्व
- तुळशीची माळ गळ्यात घातल्यानं मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात.
- माणसाची आध्यात्मिक प्रगती होते ज्यामुळे तो स्वतःला देवाच्या जवळ अनुभवतो.
- तुळशीची माळ घातल्यानं सन्मान आणि सौभाग्य लाभतं.
- मनात सकारात्मकता विकसित होते.
- मानसिक शांतता मिळते.
तुळशीची माळ घालण्याचे वैज्ञानिक महत्त्व आणि आरोग्यविषयक फायदे
एका संशोधनात आढळून आले आहे की मेंदू आणि शरीरास जोडून ठेवण्यासाठी तुळशीची माळ प्रभावी आहे. तुळशीची माळ गळ्यात घातल्याने आपल्या शरीराच्या काही महत्त्वाच्या अॅक्युप्रेशर पॉइंट्सवर दाब येतो, ज्यामुळे मानसिक ताण दूर होण्यास मदत होते.
तुळशीच्या लाकडामध्ये एक विशिष्ट प्रकाराचा द्रव आढळतो जे मानसिक ताणाला दूर करतो. या मुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते.
तुळशीची माळ घातल्यानं विद्युत ऊर्जा प्रवाह सुरळीत होत असल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण चांगलं होत. तुळशी माळेचा शरीरास स्पर्श झाल्यामुळे कफ आणि वातदोषांपासून आराम मिळतो.