जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक सहकार व पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे संपन्न झाली.
या बैठकीला कार्यकारी समितीचे सदस्य आमदार मकरंद पाटील, सुनील माने, राजेश कुंभारदरे, ॲड. विजय कणसे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये 16 डिसेंबर 2021 रोजीच्या कार्यकारी समिती बैठकीचे इतिवृत्त व अनुपालन अहवालास मान्याता देण्यात आली. तसेच या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना मार्च 2022 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. तसेच 2022-23 अंतिम अर्थसंकल्पीय तरतुदी या बैठकीत सादर करण्यात आल्या.
सन 2022-23 मध्ये हाती घ्यावयाच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरात लवकरात सादर करावे तसेच अपूर्ण कामाची निधी मागणी जिल्हा नियोजन समितीस सादर करण्याच्या सूचना करुन कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत असे, निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी या बैठकीत दिले.