दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैश्विक ओळखपत्राचे (युडीआयडी कार्ड) वितरण
by
sahyadrilive
October 20, 2022 5:54 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। मुंबई उपनगरातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैश्विक ओळखपत्राचे (UDID CARD) वितरण सुरु झाले आहे. दिव्यांगानी वैश्विक ओळखपत्र चेंबूर, कलेक्टर कॉलनी येथील रोचीराम टी थडानी स्कूल फॉर हिअरिंग हॅन्डीकॅप येथून या ओळखपत्राचे वितरण सुरु असल्याची माहिती मुंबई उपनगरच्या समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी दिली.
वैश्विक ओळखपत्राद्वारे केंद्राच्या व राज्य सरकारच्या विविध योजना व सवलतींचा लाभ दिव्यांगांना घेता येतो. मुंबई उपनगरातील दिव्यांगांनी सोमवार ते शुक्रवार या दिवशी कार्यालयीन वेळेत आपले आधार कार्ड घेऊन वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) प्राप्त करून घ्यावे, असे अवाहनही त्यांनी केले.