होलेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिलीप सुतार
खेड । सह्याद्री लाइव्ह । होलेवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिलीप नामदेव सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच मोनिका मंगेश होले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली.
होलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, माजी उपसरपंच साक्षी होले यांनी राजीनामा दिला, त्यानंतर या रिक्त जागेसाठी सरपंच मोनिका होले यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली. ग्रामसेवक बाबाजी चव्हाण यांनी सहायक केले.
सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दिलीप नामदेव सुतार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. ग्रामसेवक बाबाजी चव्हाण आणि सरपंच मोनिका होले यांनी दुपारी दोन वाजता उपसरपंचपदी दिलीप सुतार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बबन होले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष होले, कुरकुंडी गावचे माजी सरपंच कैलास सुतार, मराठा महासंघाचे खेड तालुका अध्यक्ष प्रवीण होले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी होले, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य नितीन होले, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्या सोनम होले, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्या साक्षी होले, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य संगीता होले, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्या मनीषा होले, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार होले, विमा सल्लागार संतोष होले, सोनबा होले, बाबुराव होले, तुषार होले, विशाल होले, निलेश होले यांच्यासह कांचन सुतार, शोभा होले, रंजना होले, सुनीता होले, प्रभावती होले उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच दिलीप सुतार यांच्या निवडीनंतर ग्रामसेवक बाबाजी चव्हाण, माजी सरपंच कैलास सुतार यांनी सुतार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माजी केंद्रप्रमुख निवृत्ती नागोजी भालेराव आणि अपंग संघटना सेल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष गाडेकर यांनी दिलीप सुतार यांचा सन्मान केला. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले यांनी नवनिर्वाचित उपसरपंच दिलीप सुतार यांचा सन्मान केला.