ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्री यात्रेसाठी भावीकांची गर्दी
by
sahyadrilive
February 18, 2023 4:50 PM
भीमाशंकर । सह्याद्री लाइव्ह । भगवान शंकरांचे सहावे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेसाठी भावीकांची अलोट गर्दी जमली. दुपारपर्यंत २ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी महादेवांचे दर्शन घेतले असून यात्रेचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रात्री 12 वाजता माजी गृहमंत्री दिलिपराव वळसे पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, पुणे जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील उपाध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील, पूर्वाताई वळसे पाटील यांनी पवित्र शिवलिंगावर जल्लाभिषेक केला.