“देवेंद्र फडणवीस हेच सध्या राज्य चालवत आहेत” – संजय राऊत
by
sahyadrilive
November 10, 2022 3:28 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी १०३ दिवस अटकेत असलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यकत केल्या आहेत.
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकारणातील कटुता संपवावी असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय हे महाराष्ट्राला शोभणारं आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आम्ही राजकीय लढाया लढू पण मी त्यांना यासाठी भेटणार असं म्हटलं कारण सध्या राज्य तेच चालवत आहेत, बाकीचे नुसतेच उंडारत आहेत”
आमच्यासारख्यांना बेकायदेशीर अटक होणं हा या देशाची राज्यघटनाच गोठवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं मी तुरुंगात असताना ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यात शिवसेनेचं चिन्हं गोठवणं हे काही वेगळं नाही, असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.