विकास दिव्यकिर्ती यांच्या ट्रेनिंग इन्स्टिट्युटवर बंदी घालण्याची मागणी
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह । दृष्टी IAS ट्रेनिंग इन्स्टिट्युटचे संस्थापक विकास दिव्यकिर्ती यांच्यावर रामायणातल्या सीताबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्या ट्रेनिंग इन्स्टिट्युटवर बंदी आणावी अशी मागणी सध्या नेटक-यांकडून केली जात आहे. ट्वीटरवर सध्या #BanDrishtiIAS असा ट्रेंड होत आहे.
विकास दिव्यकिर्ती यांनी एका लेक्चरच्या दरम्यान उदाहरण देताना राम आणि सितेच्या संभाषणाचा संदर्भ दिला तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IAS ट्रेनिंग इन्स्टिट्युटचे विकास दिव्यकिर्ती यांनी एका पुस्तकात लेखकाने काय लिहिलं आहे यासंदर्भातील किस्सा सांगितलं आहे. तर अनेकांकडून त्यांनी रामायणातील सीताबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान दिवाकिर्ती यांनी रामायणात रावणाचा वध केल्यावर एका पुस्तकात वर्णन केलेल्या प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. त्या लेखकाने पुस्तकात असं लिहिलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. तर अनेकांकडून त्यांच्या व्हिडिओमधील ४५ सेकंदाचा भाग कट करून व्हायरल केला जात आहे.
वादाचे मुळ कारण
उदाहरण देताना विकास दिव्यकिर्ती म्हणाले “एका पुस्तकातील रामायणाचे वर्णन करताना असं लिहिलं आहे की, रामायणामध्ये रामाने रावणाचा वध केल्यानंतर सीता खूष झाली पण राम सीतेला म्हणाले की, मी माझ्या कुळाच्या स्वाभिमानासाठी रावणाला मारलं आहे. पण तुला वाटत असेल की तुझ्यासाठी मी युद्ध केलंय तर तो तुझा गैरसमज आहे. आणि कुत्र्याकडून चाटल्यानंतर अन्न खाण्यायोग्य राहत नाही त्याचप्रमाणे तू माझ्या योग्यतेची नाही असं राम म्हणत नाही तर त्या पुस्तकात लेखकाने लिहिलंय” असं दिव्यकिर्ती म्हणाले होते.