धरण भरले, पण पाण्यासाठी झुंज सुरूच; पेठ येथे नागरिकांचे आंदोलन
न्याय मिळाला नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा
पेठ । सह्याद्री लाइव्ह । नुकतेच खेड तालुक्यातील कळमोडी धरण शंभर टक्के भरले आहे. धरणक्षेत्रात १ जुनपासून ४२८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परंतू या धरणाच्या पाण्यासाठी सातगाव पठार भागातील नागरिकांना झुंज द्यावी लागत आहे.
कळमोडी धरणाचे पाणी सातगाव पठार भागाला मिळावे यासाठी नागरिकांनी पेठ येथे मंगळवारी (दि. १८) भरपावसात आंदोलन केले. डिंभे धरणाचे पाणी बोगद्याद्वारे नगर जिल्ह्यात नेण्याच्या योजनेचाही यावेळी निषेध करण्यात आला. आपल्याजवळ धरण असून आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळत नाही या मुद्यावर नागरिक आक्रमक झाले होते.
न्याय मिळाला नाही तर जलसमाधी घेऊ
आता जर न्याय मिळाला नाही तर कळमोडी धरणामध्ये जलसमाधी घेऊ असा इशारा आंदोलक देवीदास दरेकर यांनी दिला आहे. नायब तहसिलदार सचिन वाघ यांना मागण्यांसदर्भाचे निवेदन देऊन हे आंदोलन थांबवण्यात आले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES