महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पहील्याच दिवशी वाद
संभाजीनगर । सह्याद्री लाइव्ह । ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल चुकीचा इतिहास मांडल्याचा आरोप करत सावरकर प्रेमींनी नाटक तात्काळ बंद करा, असे म्हणत थेट घोषणाबाजी केली. नाटकाचा प्रयोग बंद पाडण्यात आला. त्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
नगर केंद्रावर सुरू असलेल्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नगर येथील स्वराज्य प्रतिष्ठानने ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ हे नाटक सादर केले. ‘मी नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकांमध्ये दाखवण्यात आलेल्या विषयांमध्ये प्रामुख्याने गांधी हत्या केल्याचा नथुराम गोडसे यांना पश्चाताप झाला, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर ही दोषी होते, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टीवर आक्षेप घेत सावरकर प्रेमींनी गोंधळ करत नाटक अंतिम टप्प्यात असतानाच बंद पाडले. नाटकाचा शेवटचा अंक सुरू असताना सभागृहातील एका गटाने उभा राहून तत्काळ नाटक बंद करा, अशी मागणी केली.