महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन
by
sahyadrilive
December 3, 2022 4:12 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील.
या सल्लागार समितीमध्ये डॉ.प्रकाश खांडगे, शाहीर अंबादास तावरे, केदार शिंदे, भरत जाधव, प्रशांत दामले, नंदेश उमप, शाहीर देवानंद माळी, अंकुश चौधरी, कैलास महापदी, चारुशीला साबळे- वाच्छानी, शरद पोंक्षे हे अशासकीय सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.
ही समिती सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या कार्यक्रमांचे नियोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयास सादर करेल. या समितीची बैठक दर तीन महिन्यातून एकदा होणार आहे. जन्मशताब्दी वर्ष संपुष्टात आल्यानंतर समितीचा कार्यकाळ आपोआप संपुष्टात येईल.