दहावी, बारावी परीक्षार्थींना दिलासा; परीक्षेच्या एक दिवस आधीही अर्ज भरता येणार
by
sahyadrilive
January 1, 2022 10:00 AM
पुणे : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. दहावी परीक्षेसाठी 27 डिसेंबर ते 1 जानेवारी व बारावीसाठी 19 ते 28 डिसेंबरदरम्यान विलंब शुल्काने अर्ज भरता येणार असल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विलंब शुल्क आकारू नये, असे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांचे विलंब शुल्कच माफ झाले आहे. ही सुविधा केवळ मार्च-एप्रिल 2022 परीक्षेपुरतीच आहे. दहावीची परीक्षा 15 मार्चपासून, तर बारावीची 4 मार्चपासून सुरू होत आहे, असे राज्य मंडळाच्या प्रभारी सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.