काँग्रेसच्या आझादी पदयात्रेचे खेड तालुक्यामध्ये जोरदार स्वागत
खेड । सह्याद्री लाइव्ह । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी यांच्या वतीने संपूर्ण देशात ‘आझादी गौरव पदयात्रा’ आयोजित करण्यात आली. ९ ऑगस्ट या ‘क्रांती दिन’ ते १४ ऑगस्ट दरम्यान नियोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी पदयात्रेचे स्वागत राजगुरुनगर व चाकण येथे खेड तालुका काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी ‘गाव तिथे शाखा’ अंतर्गत चाकण येथे युवक काँग्रेस कमिटी फलक अनावरण करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, जिल्हा सहप्रभारी उत्कर्षा रुपवते, दादू खान, देविदास भन्साळी, महिला जिल्हाध्यक्षा किरण काळभोर, नंदूकाका जगताप, तालुकाध्यक्ष विजय डोळस, गीता मांडेकर, अमोल दौंडकर, वंदना सातपुते, सतीश राक्षे, सुभाष गाढवे, चंद्रकांत गोरे, सुभाष होले, जमीर काझी, बाळासाहेब गायकवाड, मयूर आगरकर, ॲड. निलेश कड पाटील, ॲड. गणेश सहाणे, दिपक थिगळे, धनेश म्हसे, संतोष गाडेकर, दत्ता गोरे यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.