स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल : घरीत ‘सुसाईड नोट’ आढळली
दौड : दौंड तालुक्यातील केडगाव येथील एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना विस्मरणात जाऊपर्यंत पुन्हा एकदा देऊळगाडा येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मल्हारी नामदेव बारवकर, असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
दौंड तालुक्यात पाच महिन्यांपूर्वी केडगाव येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली होती. त्यावेळी या घटनेने संपूर्ण राज्य हादरवले होते. आता तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. परीक्षा देत असलेल्या विद्यार्थीने मल्हारी याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली आहे.
यात त्याने आई-वडिलांच्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही. तसेच माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहून ठेवले आहे.
मल्हारी हा स्पर्धा परीक्षेची पूर्व परीक्षेची तयारी करीत होता. त्याने दोन ते तीन परीक्षा दिल्या होत्या. मात्र, त्याने नैराश्यातून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मल्हारीच्या कुटुंबासहित दौंड तालुक्यात शोककळा पसरली आहे.