पुण्यात CNG झाला महाग
८७ वरून ९१ रूपये प्रतिकिलो
by
sahyadrilive
October 3, 2022 4:52 PM
पुणे । सह्याद्री लाइव्ह । पुण्यात CNG च्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MGNL) ने घेतला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या परिसरात CNG च्या दरात ४ रूपये प्रतिकिलो ने भाव वाढणार आहेत.
MGNL ने काही दिवसांपुर्वीच CNG च्या दरात दरात ४ रूपये प्रतिकिलो ने कपात केली होती. त्यामुळे CNG चा भाव ९१ रूपयावरून ८७ रूपयावर आला होता. आता हिच कपात रद्द करत दर पुन्हा वाढवण्याचा निर्णय MGNL ने घेतला आहे.
सामान्य जनतेला काही काळ दिलासा मिळाला असला तरी पुन्हा सणांच्या तोंडावर खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे.