चीन-पाक यांची CPCE प्रकल्प भारतासाठी धोका?
बीजिंग । सह्याद्री लाइव्ह। चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (CPEC) या महत्वाकांक्षी प्रकल्पाला या दोन्ही देशांनी मंजुरी दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ हे चीनच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग आणि शेहबाज शरीफ यांची भेट झाली. या भेटीत चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC)वर सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले.
या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीतील व्यापक सहकाऱ्यावर चर्चा केली. तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली.
CPEC हा चीनचा वायव्य शिनजियांग उईगुर स्वायत्त प्रदेश आणि पाकिस्तानातील बलुचिस्तानच्या पश्चिम प्रांतातील ग्वादर बंदर यांना जोडणारा प्रकल्प आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांचा हा कॉरिडॉर 3,000 किमी लांबीचा आहे. हा पाकिस्तान आणि चीनमधील द्विपक्षीय प्रकल्प आहे. ज्याचा उद्देश ऊर्जा, औद्योगिक आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांसह महामार्ग, रेल्वे आणि पाइपलाइनच्या नेटवर्कसह संपूर्ण पाकिस्तानमध्ये कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देणे हा आहे.
CPEC हा प्रकल्प चीन आणि पाकिस्तानमधून जाणार असला तरी या दोन्ही देशांच्या सीमेवर भारताची सीमा आहे. बलुचीनस्तानमधून हा मार्ग जाणार असून त्यावर भारतानानं कायम आपलाच दावा केला आहे. या प्रकल्पामुळे पाकिस्तानकडून कायमच सुरु असलेला दहशतवाद्यांचा आणि घुसखोरांचा त्रास वाढू शकतो म्हणुनच प्रकल्प भारतासाठी धोकादायक ठरू शकतो.