मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायक पंडित रामदास कामत यांना श्रद्धांजली
by
sahyadrilive
January 9, 2022 3:52 PM
मुंबई : संगीत रंगभूमीचा सच्चा साधक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक,अभिनेते पंडित रामदास कामत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, पंडित रामदास कामत यांनी मराठी संगीत रंगभूमीची निस्वार्थ आणि निखळ अशी सेवा केली. गायक, अभिनेता म्हणून ते भावसंगीत, चित्रपट संगीत आणि लोकसंगीत क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. मराठी संगीत रंगभूमीचा सच्चा साधक म्हणता येईल अशी त्यांची कला कारकीर्द होती. त्यांनी आपल्या या कलासाधनेचा आदर्शच नव्या पिढीला घालून दिला आहे. ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.