छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ आज सकाळीं बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भुजबळ यांना गेल्या 3 दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना आज मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल परिसरात गर्दी करू नये असं आवाहन भुजबळ यांच्याकडून करण्यात आलं आहे.
छगन भुजबळ यांचा 75 वा वाढदिवसादरम्यान भुजबळ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्या दरम्यान अनेकांच्या भुजबळ संपर्कात आल्याने आठ ते दहा दिवस भुजबळ आजारी होते. त्यावेळी देखील भुजबळ काही दिवस मुंबईत उपचार घेत होते.