ढुम्या डोंगरावर हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा
खेड : चांडोली-वडगाव पाटोळे गावच्या हद्दीवरील ढुम्या डोंगरावरील मारूती मंदिर परिसरात आज, शनिवारी (दि. १६) हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. मंदिर परिसर ‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने दुमदुमला.
पहाटे पाच वाजता पुजारी राजेंद्र भागवत, पुरोहित महादेव संभूस यांच्या उपस्थित महाभिषेक करण्यात आला. हनुमान जन्मोत्सवानिमित्त हभप अशोक महाराज सांडभोर यांचे प्रवचन झाले. त्यानंतर सर्व भाविक-भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
उत्सवानिमित्त नियमित योगदानाबद्दल राजेंद्र भागवत, सुधाकर जाधव, सोपान राक्षे, सुरेश कातळे, योगशिक्षक महादेव घुले, नामदेव चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, हनुमान जन्मानिमित्त ढुम्या डोंगर परिसरात भगवा झेंडे लावण्यात आले होते. या कार्यक्रमास राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक सतीश नाईकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हनुमान जयंती उत्सवाचे संयोजन ॲड. महादेव घुले, ॲड. रामचंद्र घोलप, नामदेव चव्हाण, सुरेश कातळे, जयंत घोरपडे, प्रवीण दौंदेकर, माऊली करंडे, ॲड. पांडुरंग राऊत, ॲड. दिलीप करंडे, ॲड. प्रकाश तळेकर, सुधाकर जाधव, विशाल राक्षे, मारूती घुमटकर, राजेंद्र भागवत, डी. आर. पाचारणे, एकनाथ सांडभोर, शंकर बोंबले, अजित डोळस, विलास सोनवणे, डी. के. वडगावकर, राहुल शिंदे, रवीकाका कुलकर्णी, सोपान राक्षे, दत्ता रुके, कैलास दुधाळे, बाळकृष्ण पाटोळे, हिरामण पडवळ, राजन जांभळे, विजयकुमार शेटे, मनोहर आवटे, सोपान चव्हाण, प्रमोद गाणू, महेंद्र वाळूंज, रवींद्र सातकर, उद्धव कुंभार, रवींद्र शिंदे, दादा कल्हाटकर यांनी केले.